सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा ‘ उपक्रम संपन्न
वाचन संस्कृतीच्या विकासाकरिता तसेच तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. १ जानेवारी २०२५ रोजी ग्रंथालय विभाग व सिपना रीडर्स क्लब च्या वतीने ग्रंथप्रदर्शन व सामूहिक वाचन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झालेत . या प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केलेल्या ग्रंथांपैकी आवडीचा एक ग्रंथ निवडून एक तास वाचन केले. सुरुवातीला महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. शिरीष देशपांडे यांनी वाचन संकल्प उपक्रमाची भूमिका विशद करून वाचनाचे महत्व तसेच ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या अवांतर विषयांवरील वाचन साहित्याची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. नवीन वर्षात अधिकाधिक वाचन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. जगदीशभाऊ गुप्ता व प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांच्या मार्गदर्शनात ग्रंथपाल डॉ. शिरीष देशपांडे तसेच सर्व ग्रंथालय कर्मचारी व रीडर्स क्लब च्या सदस्यांनी ‘वाचन संकल्प उपक्रम’ कार्यक्रम यशस्वी केला.